। एक । हुसेनच्या आयुष्याची हृदयद्रावक कथा ऐकून बॅण्ड ताफ्यातल्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. सकाळी हुसेन अंथरुणातच लोळत पडला. कोणीतरी त्याला हाक मारली, ‘‘आर.के., आर.के., लवकर ऊठ. आता चहा यायची वेळ झाली. आज खास सगळ्यांसाठी पाव मागितलेत.’’ हुसेन आळुके-पिळुके देत उठला. तोंड धुऊन चहा-पावाच्या पंक्तीत सामील झाला. हुसेन म्हणाला, ‘‘असे पाव आमच्या गावाकडे मिळत नाहीत. मुंबईची टेस्ट लई भारी.’’ सावत्या म्हणाला, ‘‘अरे इराण्याच्या हॉटेलातला खाल्ला का तू कधी?’’ ‘‘नाही.’’ ‘‘ठीकय, तुला घेऊन जातो. ही पार्टी माझ्यातर्फे.’’ सगळे हसले. अरे, राजा उदार झाला आणि हाती कोहळा दिला. सावत्या डोळा मारत म्हणाला, ‘‘अरे त्यालाच तर जीवाची मुंबई म्हणत्यात.’’ जीवाची मुंबई म्हणजे काय, हे त्याला आता कळलं. सावत्यानं त्याला इराण्याच्या हॉटेलात चहा-पावा...