Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

हुसेनचं पत्र

    मुंबईला येऊन आठ-दहा दिवस झाले. रात्री झोपताना हुसेनला रोज गावाकडची आठवण येत होती. बुढ्ढीची, भावांची, भावजयांची, पत्नीची, घरातल्या सगळ्या लेकरांची अन् गुराढोरांचीसुद्धा. आठवणीने तो कष्टी होई. एक दिवस त्यानं गावाकडं पत्र लिहायचं ठरवलं. बॅण्ड ऑफिसमधल्या एका कपाटात त्याला बरीच कोरी पानं सापडली. पेनही सापडला.     हुसेनला पत्र लिहायची सवय कुठंय. खरं तर काहीच लिहायची सवय नाही. अक्षरांशी तर काडीमोड झाल्यासारखा होता. शेवटी अडखळत-अडखळत, वेड्या-वाकड्या अक्षरात त्यानं लिहायला सुरुवात केली. त्यानं ठरवलं होतं, पत्रातून आपण खूश आहोत आणि आनंदी आहोत- हे कळवावं. म्हणजे घरचे लोक आपली काळजी करणार नाहीत.     ‘‘सबको सलाम आलेकुम’’     ‘‘आता माझं इथं चांगलं बस्तान बसलं आहे. अल्ला दयाळू आहे आणि त्याच्या कृपेने इथं एक चमत्कारच झाला. तो असा की, मी एका बॅण्ड कंपनीत संगीत शिकायला गेलो. आता शहरात आलं, तर काहीतरी शिकायला पाहिजे, हुशार व्हायला पायजे ना! नुसतं आबड्यावनी फिरण्यात माझं दिल रमत नवतं, म्हणुनशान संगीत शिकावं म्हणून चौकशीला गेलो. तर तो बॅण्ड मालक, त...

हुसन्याचा आरके झाला

      दुसर्‍या दिवशी सकाळी हुसेनला घेऊन आबड्या इमारतीतल्या सावंत आजीकडे घेऊन गेला. सावंत आजी मूळच्या कोकणातल्या, खेड्यापाड्यातल्या आठवणीत रमणार्‍या. गावाकडून पोटापाण्यासाठी आलेल्या माणसांना मदत करणार्‍या. त्यांच्याच कृपेने आबड्याला जीन्याखाली झोपण्यापुरता आसरा मिळाला होता. आबड्यासाठी तर त्या देवासमान. पापड विकून जमा झालेले पैसे तो सावंत आजीकडे ठेवत असे. गावाकडं जाताना ते परत घेत असे. सावंत आजी त्याच्या साचलेल्या पैशात अकरा रुपयांची भर घालून देत.       आबड्याबरोबर हुसेनला पाहून त्यांनी हुसेनची चौकशी केली. हुसेनला काहीतरी चांगलं काम हवं होतं. सावंत आजीच्या ओळखीचा माणूस एका बॅण्ड कंपनीत काम करत होता. सावंतबाईंनी विचारलं, ‘‘जा, तो आमच्या गावचा सावत्या तुला बॅण्ड कंपनीत काम देईल.’’ हुसेन आणि आबड्या बाहेर पडले. आबड्या म्हणाला, ‘‘पापडवाल्याकडं जाऊन पैसे जमा करतो, तू पण चल. पापड विकण्याच्या नादात फिरस्ती होते. तुला मुंबई बघता येईल.’’       ‘‘आबड्या, तुला मी सांगितलं ना, तो पापडवाला आदमी मुझे बहुत डेंजर लगता ह...

हुसेनभाई मुंबईत

     हुसेनभाई आबड्याबरोबर मुंबईत पोचला, दौंडहून गाडी मुंबईकडं निघाल्यावर त्याला वाटले आपण फार आश्‍चर्यकारक आणि चमचमाटी दुनियेतून प्रवास करीत आहोत. अल्लाकडे जाण्याचा मार्गसुद्धा असाच असेल का? असा प्रश्‍नही त्याच्या मनात पडला. पुणे स्टेशन आल्यावर आणि पुढे पाच-पंचवीस मैलाचा रस्ता म्हणजे चमचम चमकणार्‍या चांदण्याचे आकाशच त्याला वाटले. ह्या आकाशातच पुढे कोठेतरी अल्ला असेल का?       मधून मोठमोठ्या गंजीने पेट घ्यावा किंवा उसतोड झाल्यावर उसाचे मोकळे रान ठणाठणा पेटून दिल्यावर आगीचे डोंब उसळावेत तशा आगीचा भास होत होता. हुसेनभाईनं हे आबड्याच्या लक्षात आणून दिल्यावर आबड्या फक्त हसला. म्हणाला, ‘‘खरा जाळ तर तुला आता मुंबईत पोचल्यावर दिसन’’     ‘‘जाळ?’’ हुसेन घाबरला.   ‘‘अरे, जाळ म्हणजे आगीचा जाळ नाही. पैशाचा जाळ, श्रीमंतीचा जाळ, मगरूरीचा अन् मजबुरीचा. आपण डोळं मिटल्यावाणी सोंग करायचं. फक्त पहायचं, अन् जगायला शिकायचं. पोटाची खळगी भरली की पोटातला जाळ बी निवतो. तो जाळ निवला की आपला दिवस फत्ते झाला. हुसन्या, तुला जो जाळ दिसत...