Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

गर्द धुक्यात हुसेनभाई

              हुसेनभाई गावात पोचल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. सगळ्यांना तर तो परत यावा अन् त्याची गप्पांची मैफल ऐकावी, पार परत फुलावा, गडबडगुंडी परत सुरू व्हावी असे वाटत होते. त्याचा आवाज ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आसुसले होते. आणि तो हुसेन आला म्हटल्यावर, आता एकच लक्ष लागलं, ते म्हणजे तो घरातून बाहेर पडण्याकडं आणि पारावर कधी येतो याकडं. हुसेन घरी आल्यावर बुढ्ढीजवळ बसला. पण तो काही बोलत नव्हता. जुजबी प्रश्‍नोत्तरं झाली. बुढ्ढीला वाटलं, प्रवासाचा शीण असतो. रात्रीचं जागरण झाल्यामुळे तो असा थकल्यासारखा झाला असावा. हुसेन अंघोळीला गेला. त्याच्या बीबीनं गरम पाणी आणून ठेवलं, पण तिच्याकडं पाहूनही तो फक्त केविलवाणं हसला. काहीच बोलेना म्हटल्यावर तीच म्हणाली, ‘‘अजून पाणी पाहिजे का?’’ पण हुसेननं फक्त नकारार्थी मान हलवली. ती बराच वेळ तिथं घुटमळली, तिला वाटलं, हुसेन बोलेन, काही विचारील, पोराबाळांबद्दल काही जाणून घेईल. पण हुसेन फक्त गरम पाण्यातून बाहेर येणार्‍या वाफांकडं एकाग्र होऊन लक्ष देत बसला. शेवटी त्याची बीबी म्हणाली, ‘‘चलो, जल्दी नहाके आ...