Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

हुसेनभाईचा ‘राग’

    पारावर माणसं एकमेकांची वाट पाहत बसली. हुसेनचा विषय निघाला. हुसेन फकिराबरोबर गेला होता आणि दोन दिवसांपूर्वीच गावात आला होता , एवढी माहिती सगळ्यांना होती. तेवढ्यात हुसेनचा जिगरी दोस्त माणिक टपकला. कोणीतरी विचारलं , ‘‘ माणिक शेठ , आपले दोस्त का येत नाही इकडं ? दोन दिवस झाले परत येऊन. पण फिरकलासुद्धा नाही. आता आजतरी येणार हाये का नाही त्यो इकडं ?’’ ‘‘ आला तर यीन नाहीतर नाय यायचा ,’’ माणिक म्हणाला. ‘‘ दमलं असन फकिराबरोबर वणवण भटकून. ’’ ‘‘ त्या भटकण्याचीबी त्याला कसकस आली असन बघा. आता फकीर माणसावनी वागायला याला जमतंय व्हय. ’’ ‘‘ आवो , तुमच्या ध्यानात आलं का , ह्यो फकिरालाच त्याच्या लायनीत वढन. हुस्न्या म्हंजी बोलायला लई चतुर. बिरबलावनीच. फकिराला बातामंधी येडा बनवायला बसलाय. ’’ ‘‘ आवं त्यो अल्लाला सुदिक चकवा दिइन. ’’ ‘‘ पण कायबी म्हणा , हुस्न्या लईच भारी राव. आता त्यो इथं नाय आलं तर आपल्याला बी चुकल्यावनीच वाटतं. ’’ ‘‘ असला माणूस लागतो एखांदा म्हंजी पक्का टाईमपास. ’’ ‘‘ त्याच्या बाता कशा का असना पण गुंगीवतय राव ती समद्याला. ’’ ‘‘ आता त्याचं कसंय , त्ये ह...