Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

हुसेनभाईची वापसी

। एक ।         हुसेनच्या आयुष्याची हृदयद्रावक कथा ऐकून बॅण्ड ताफ्यातल्या सगळ्यांनाच त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. सकाळी हुसेन अंथरुणातच लोळत पडला. कोणीतरी त्याला हाक मारली, ‘‘आर.के., आर.के., लवकर ऊठ. आता चहा यायची वेळ झाली. आज खास सगळ्यांसाठी पाव मागितलेत.’’          हुसेन आळुके-पिळुके देत उठला. तोंड धुऊन चहा-पावाच्या पंक्तीत सामील झाला.          हुसेन म्हणाला, ‘‘असे पाव आमच्या गावाकडे मिळत नाहीत. मुंबईची टेस्ट लई भारी.’’          सावत्या म्हणाला, ‘‘अरे इराण्याच्या हॉटेलातला खाल्ला का तू कधी?’’          ‘‘नाही.’’          ‘‘ठीकय, तुला घेऊन जातो. ही पार्टी माझ्यातर्फे.’’         सगळे हसले. अरे, राजा उदार झाला आणि हाती कोहळा दिला. सावत्या डोळा मारत म्हणाला, ‘‘अरे त्यालाच तर जीवाची मुंबई म्हणत्यात.’’ जीवाची मुंबई म्हणजे काय, हे त्याला आता कळलं. सावत्यानं त्याला इराण्याच्या हॉटेलात चहा-पावा...

हुसेनभाईचा छकडा

     संध्याकाळी बॅण्ड कंपनीतले लोक ज्यांना घर नाही किंवा बाहेर गावाहून आलेले आहेत, अशी मंडळी बॅण्डच्या कार्यालयातच संध्याकाळी लांबलचक मोठी सतरंजी पसरून झोपत असत. पडल्या-पडल्या गप्पा-टप्पा, चेष्टा-मस्करी, बॅण्डमध्ये वाजवायच्या गाण्यांची चर्चा, ऑर्केस्ट्रा अशा गप्पा होत. कधी एकमेकांच्या सुख-दु:खाविषयी होत. आर. के.च्या गप्पा त्यांना नेहमीच आवडत. बोलता-बोलता कोणीतरी आर. के.ला विचारलं,      ‘‘आर. के. मुंबईला येण्यापूर्वी तू गावाकडं काय करत होतास? तुझ्यावर ह्या वयात अशी मुंबईला यायची आफत का आली? घरी रागावून वगैरे तर नाही आला ना?’’      आर. के. दोन मिनिटं गोंधळलाच. ह्या प्रश्‍नाचं उत्तर काय द्यावं. आपण गावाकडे फारसं काय, काहीच काम करत नव्हतो. एकत्र कुटुंबात सगळ्यांनी सांभाळून घेतलं, पण आपण काहीच काम करत नव्हतो, हे सांगणे म्हणजे तर गैरच. जरा शरमल्यावणीच वाटतंय. बरं, आपण काही रूसून, भांडून, पळून आलेलो नव्हतो, उलट घरच्यांनी मुंबई पाहण्यासाठी पैसे दिले होते. बॅण्डमध्ये नोकरी काही जमण्यासारखी नव्हती. उगीच शिपायासारखी कामं किंवा शोभेला माणूस उ...

हुसेनची बाहुली

   सकाळी उठल्याबरोबर हुसेननं अल्लाची याद केली. राज कपूरला पाहिल्याची त्याची नशा अजून उतरली नव्हती. सावत्यानं शेंडी लावली तरी अल्लाची कृपा असेल तर कोणीही माझ्या नशिबापासून मला लपवू शकत नाही.      अल्लाचे आभार मानण्यासाठी तो सकाळीच एका मशिदीत गेला. तिथं एका फकिराने त्याला उदी लावली. फकीर तिकडे चालला. त्याच्या मागं चालत चालत हुसेन गेला. तिथं बरीच काझी मंडळी जमली होती आणि समोर बरेच सभ्य गृहस्थ उभे होते. ते रोज गुरूंचे दर्शन घेऊनच कामाला जात.       त्यातला प्रमुख काझीसमोर सर्वांनी वाकून सलाम केला. मग त्या धर्मगुरूने ‘फतिहा’ म्हणजे कुरणाचे पहिले भाग म्हटले, ते झाल्याबरोबर प्रत्येकजण रांगेत उभे राहून एक-एक माणूस त्याला सलाम करून पुढे गेले आणि बाहेर पडले.      हुसेनचा जेव्हा नंबर आला, तेव्हा त्याला ह्या प्रथा माहीत नव्हत्या. धर्मगुरूकडे पाहत तो नुसताच उभा राहिला. मागच्या माणसाने त्याला सांगितले, ‘‘चल, आगे चल, सिधा खडा रहता है. सलाम नहीं करनेका?’’ हुसेननं सलाम केला व पुढे गेला. मगाशी भेटलेल्या फकिराने हुसेनला विचारलं, ‘‘तुझे...