Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

हुसेन - राज कपूरची हास्य भेट

    बर्‍यावाईट गोष्टी पाहत हुसेन आता मुंबईत रमू लागला. खरं म्हणजे बॅण्ड पथकात तो जास्तीच रमू लागला. आपल्याकडे अशी काही कला नसल्याची खंत त्याला वाटत असे. बॅण्डची प्रॅक्टिस चालू असताना त्यांच्या होणार्‍या चर्चा, वाद ऐकताना त्याला गंमत वाटू लागली.     मोकळा वेळ असेल तेव्हा किंवा रात्री झोपताना त्याला घरची आठवण येत राही. एवढ्या मोठ्या एकत्र परिवारात राहायची सवय अन् इथं एकदम एकलेपण आणि पोरकेपण. आपण मुंबईला नशीब आजमायला जावू असं त्याला वाटत होतं. पण तसं काही घबाड त्याच्या हातात लागत नव्हतं. सावत्या म्हणत होता, ‘‘महिना दोन महिन्यात काही घडत नसतं. इथं आख्खी जिंदगी पणाला लावावी लागते. तेव्हा कुठं थोडंफार हाताशी येतं.’’ बुढ्ढीची, मुन्नीची, बायकोची, भावांच्या पोरांची आठवण आली की तो अबोल होईल, होमसिक झाल्यासारखं त्याला वाटे. आपण तर बुढ्ढीला मुंबई पाहायला जातो एवढंच सांगितलं होतं. आता ते काम झालं की आपण परत गावाकडं परतु असं त्यानं नक्की केलं.      हुसेनच्या दृष्टीनं त्याच्यासाठी महत्त्वाचं काम राहिलं होतं, ते म्हणजे सावत्याच...

हुसेन चौपाटीवर - २

     दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आबड्या हुसेनकडं आला. डोक्यावर पापडाची पाटी होतीच. ठरल्याप्रमाणं ते चौपाटीवर गेले. आबड्यानं नजर टाकली. ते लोक आले नव्हते. मग त्यानं चौपाटीवर फेऱ्या मारल्या- ‘पापऽऽड, पापऽऽड, खुसखुशीत, कुरमुरीत, मुगाचे, उडदाचे पापडऽऽ’, लोक पाहत होते. मजा करत होते. पण ह्या पापडवाल्याकडं कुणाचं लक्ष जाईना.     तेवढ्यात दहा-पाच माणसांचा घोळका दिसला. आबड्या अन् हुसेन घोळक्यात अंग घुसवत शिरले. माकडं कुठून आली, कशी आली, यांचा मालक कोण, काहीच कळेना, तेवढ्यात एका माणसानं आबड्याचे पाच-सहा पापड विकत घेतले अन् माकडांकडं फेकले. माकडं चवताळली अन् उड्या मारत माणसांच्या मागं लागली, तशी माणसं भन्नाट पळत गेली. माकडं उड्या मारत गेली. कोणी घाबरलेलं, कोणी हसत सुटलेलं.     हुसेन म्हणाला, ‘‘माकडामुळं का होईना, तुझी भवानी झाली.’’ ‘अल्ला को चिंता’ म्हणत आबड्या पुन्हा  गिऱ्हाइकाच्या शोधात फिरू लागला.     चौपाटीवर आलेली माणसं, गर्दी पाहून हुसेन थक्क झाला. ही गोरीगोमटी माणसं, मुलं, रंगी-बेरंगी भारी-भारी कपडे, इतकी देखणी, रूबाबदार म...

हुसेन चौपाटीवर

    हुसेनभाईच्या पत्राने गावात बातांचे पेव फुटले. आणि इकडे हुसेनभाई काळजीत. आपण मुंबईत आलो, ते काय फक्त मुंबई पाहायला? हं, आपल्याला नशीब पारखायचे आहे म्हणून आलो. आता ह्या बॅण्डवाल्यांच्यामुळं निदान झोपायची, पोटापाण्याची सोय झाली. पण पढे काय घडणार आहे? अल्लास माहीत! आपल्या माथ्यावर काय लिहिले ते आणि तेवढेच होणार. त्यानं स्वत:ची समजूत करून घेतली. दोन-तीन दिवस झाले, तसे बॅण्ड कंपनीत काही कामच नव्हते. असले तर तीन-तीन ठिकाणी हजेरी लावावी लागते. दुपारची वेळ, सहज रस्त्यावरून फिरता-फिरता तो एका गल्लीत शिरला. त्या गल्लीत माणसांचं घर जेवढं आत तेवढंच बाहेर. रस्त्यावर बाजा, खाटा टाकलेल्या. बटर, पाव विकणारे, गचाळ हॉटेल्स आणि गलका. दुपारच्या वेळेस घरी फक्त म्हातारीच माणसं, तीही घराच्या बाहेरच्या बाजूवर, पायर्‍यांवर, खाटांवर लवंडलेली. छोटी-छोटी किराण्याची, पानपट्टीची, बेकरीची दुकानं, कुबट वास आणि कळकट-मळकट संसार सांभाळणार्‍या बाया, नळाला धुणी-पाणी करण्यापासून कशात तरी गुंतलेल्या.       हुसेनच्या मनात आलं, ‘नरक’ म्हणतेत ते ह्यालाच का? मुंबईत असं पण हाये तर, त्या गल्ली...