Skip to main content

Posts

Showing posts from November, 2017

सपनोंका सौदागर

                        दुसर् ‍ या दिवशी संध्याकाळी शाळा सुटायच्या वेळेलाच हुसेन हातात जोकर घेऊन उभा राहिला . घंटा वाजली अन् पोरं पळत सुटली . हुसेनचाचा आणि त्याच्या हातातली बाहुली पाहून मुलं हुसेनचाचाच्या भोवती गोळा झाली .            जोकर हाताने उंच धरून हुसेनचाचा स्वत : भोवती गोल गिरकी मारत नाचू लागला . पोरं खिक् खिक् हसत सुटली . हुसेनचाचानं मुलांना विचारलं , ‘‘ बच्चों , ये क्या है ?’’            कोणी बाहुली , कोणी बाहुला म्हणत ओरडली .    ‘‘ अरे , ये साधारन बाहुली नहीं . इसको कहते है जोकर , क्या कहते है ?’’    ‘‘ जोकर ’’ मुलं ओरडली .     मुलांची उत्सुकता वाढली . कोणी त्या बाहुलीचे हात धरू लागले . कोणी पाय , कोणी त्याचं लालबुंद नाक ! हुसेनचाचा एकदम ओरडला , ‘‘ चूप बैठो , इसको हात मत लगावो . ये मामूली जोकर नहीं . सांगतो तुम्हाला , खाली गप्प बसा . मांडी घाल...