Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

हुसेन जरा रूको

    मुमू लग्न होऊन तिच्या सासरी गेली. नाठाळ भाऊ ताजूला घरातून हाकलून दिलं , मुमूच्या लग्नात शेरडं , करडं , बोकडं विकल्यामुळे गुरांचं वाडगं सगळं मोकळं झालं होतं , या सगळ्यांमुळे आलेल्या रितेपणाची उदासी हुसेनच्या मनावर , चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. त्यातच त्यालाच नव्हे तर घरातल्या सगळ्यांनाच हे जाणवलं होतं की , मृत्यूची सावली आपल्या घरापासून आता दूर नाही.     बुढ्ढी आता खचली होती आणि तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहर्‍यावरच्या सुरकुत्यासुद्धा चेहर्‍यावरची ओल शोषल्यामुळं एखाद्या वाळलेल्या दोडक्याच्या शिरांसारख्या दिसू लागल्या. अल्लाचा हुकूम येईपर्यंत दिवस काढायचे , एवढंच तिला वाटत होतं.    या सगळ्यांचा परिणाम प्रत्येकाच्याच वागण्या-बोलण्यावर झाला होता. हुसेन केवळ अबोलच नाही , तर दिवसभर तो रानातच काहीतरी काम करत बसे. झाडाच्या गार-गर्द सावलीत तो स्वत:चे अंग आकसून पडलेला असे किंवा उगाच आभाळाकडं नजर लावून तासन् तास बसलेला असे. त्याला आता रानातच बरं वाटे. त्यानं स्वत:ला गावापासून अलिप्त करून घेतलं होतं. त्याला आता माणसांचा , त्यांच्या गप्...

हुसेनची मुमू

    हुसेनच्या घरात मुमताजच्या लग्नाची काळजी सगळ्यांना लागली. बुढ्ढी एक-दोन दिवस गेले की म्हणायची , ‘‘ मुम्याची शादी जल्दी बनावो. मैं जानेके पहले देखना चाहती हूँ. ’’ तिनं चारी मुलांच्या मागं लकडाच लावला. थोरला गडी पाव्हण्या-रावळ्याकडं चकरा मारू लागला. कुठंतरी चांगली जागा समजावी आणि मुमूला खात्या-पित्या घरात द्यावी , एवढ्या हेतूनं त्यानं सोयरेमंडळीतली ऊठबस वाढवली होती. चार माणसांत मिसळल्याशिवाय चांगला घराणा कसा समजणार ? तो आता फिरू लागला. या कामात हुसेनचा काही उपयोग नव्हता. त्यानं कधी घराची , व्यवहाराची , समाजाची रीतभात समजून घेतली नव्हती. तो सतत एखाद्या फकिरासारखं वागत राहिला. त्याला एवढंच माहीत होतं , ‘ ऊठ म्हणलं की उठायचं अन् बस म्हणलं की बसायचं. ’ त्याची काही अपेक्षा नसते आणि तक्रारही नसते. बुढ्ढी कधी तिच्यावर चिडायची , ‘ चार मुलं जन्माला घातलेत तर जरा हालचाल करत जा की ’, पण हुसेनचं हूं नाही अन् ना नाही.      हुसेनची ही कसर त्याची बीबी भरून काढायची. घरात भरपूर काम करायची. जावांना अन् त्यांच्या मुलांना तिनं जीव लावला होता. ती ...