Skip to main content

Posts

Showing posts from April, 2018

मौतका कुआँ

      हुसेन आता रानात रमू लागला. पारावर रेंगाळणारी माणसंही आता कमी झाली. एस.टी. यायच्या-जायच्या वेळेस ती एस.टी. थांबते तिथं जमू लागली. दुपारच्या वेळेस सावली असते म्हणून काही माणसं पारावर हात-पाय पसरून घोरतही असत एवढेच. पार नावाचं एक केंद्र असं आता कमकुवत होत होतं.     शिक्षणाला बाहेर गेलेली मुलं सुट्टीत वेशीबाहेरच्या मोकळ्या पटांगणात खेळण्यासाठी जमत. खेळून दमली अन् गप्पांसाठी बसली तर कधी हुसेनचाचाचा विषय निघे. खरंतर कोणत्यानं कोणत्या कारणानं हुसेनची आठवण येतच असे. मुलं मोठी झाली ,  पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेली तरी लहानपणी हुसेनचाचाबरोबर असलेली त्यांची गट्टी ,  हुसेनचाचानं त्यांना सांगितलेल्या गोष्टी ,  त्यांच्या मनात कायम रूजलेल्या आहेत. गाव म्हणलं की ज्या गोष्टी डोळ्यासमोर पटकन उभ्या राहतात. उदा. गावाची वेस ,  मंदिरं ,  विहिरी ,  बारवा ,  झाडी ,  शाळा ,  वडाचा पार ,  तसंच हुसेनसुद्धा. हुसेनचाचांनी भन्नाट गोष्टी सांगून त्यांचं मन तृप्त केलेलं ते कसं विसरणार ?     असा हुसेनचाचा कधी भेटलाच...