Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

आमनू कासारची गोष्ट

   चार-आठ दिवस असेच गेले. हुसेन फारसा गावात दिसत नव्हता. एक-दोनदा तो पारावर हजेरी लावून गेला , पण फार वेळ रमला नाही.    लोक चर्चा करू लागले , हुसेनला भुता-खेतानं धरलंय काय. कायतरी जादू-टोणा झाल्यावणी दिसतंय. काय बोलत नाय , फुलत नाही , खुलत नाय. नुसतं मयतीला गेल्यावणी बारीक त्वांड करून बसतंय , अशा नाना शंका , चर्चा सुरू झाल्या. लोक अस्वस्थ होऊ लागले. आता लोकांनाच आजारी पडल्यासारखं वाटायला लागलं.    लोक त्याला छेडू लागले. ‘‘ हुस्न्या , जरा पयल्यावणी वाग की , कायतरी बिघडल्यावणी कुचमून पडलंय. पायजेतर काय लागतंय ती माग. पण आता गावालाच मुका करू नको. म्हंजी कसं आसतं , तू लई बोलायला चतुर , खरं बोलला तर खोटं वाटतंय अन् खोटा बोलला तर खरं वाटतंय. म्हंजी ही लईच मोठी करामत झाली. बरं त्या खर्‍या-खोट्याचा कोण हिसाब लावत बसत नाय. समदं कसं सिनिमा पायल्यावणी. तंबूतनं भायेर आलं की संबंध सुटला. आता तू राज कपूरपर्यंत पोचला म्हंजी सिनिमाची कला तुला धार्जीन दिसतीया. पण तुला कुणती नटी धार्जीन नाय दिसत. नायतर त्या बापू   पाटलाची गोष्ट बघ. लई रंगील लेका. इकडं-तिक...