Skip to main content

Posts

हुसेनभाई मुंबईला निघाला

       हुसेनभाई एकदा मुंबईला जाऊन आला. त्याची गोष्ट आता मुलं त्याच्या तोंडून ऐकतीलच पण हुसेन खरंच मुंबईला गेला होता का ?   असा कुणाला तरी प्रश्‍न पडला. तो गेला होता ही गोष्ट खरी आहे.         तो कसा गेला ,  याची पण गंमतच आहे.         हुसेनभाईला मुंबईला जावं वाटल्याबरोबर त्यानं आबड्याला गाठलं. आबड्यानी त्याचा उत्साह वाढवला ,  अन् हुसेनच्या घरच्यांनीही परवानगी दिली. अन् हळूहळू ही बातमी गावभर पसरत गेली.   गावभर दवंडी पिटवल्यासारखा बोभाटा झाला. हुसेनभाई मुंबईला चालला. कुणाला आश्‍चर्य ,  कुणाला गंमत ,  कुणाला भीती वाटत होती. कोणी म्हणालं ,  आरं ,  ह्यानं कवा गावाची शीव वलांडली नसन तो पार मुंबईला धडकायला निघालाय. कुणाला भीती वाटली ,  एवढ्या अफाट शहरात हुसन्या चुकला ,  त्याला वाहनं चुकवता आली नाही ,  रस्ता वलांडताना गडबडला ,  वाट चुकला ,  चकव्यात घावला ,  तर ह्याची ह्यालाच काय सुधरायचं नाय. त्यात कोणी म्हणलं ,  मुंबईला लई बनेल अन् गुंड माणसं आसत्येत. ह्याल...

हुसेनचा मित्र - ताशावाला आबड्या

    नेहमीप्रमाणे पारावर माणसं जमलीच होती, हुसेनलाच जरा वेळ लागला. हुसेनला पाहून माणसं खुलली. बराच वेळ एस.टी. ची वाट पाहत बसावं आणि इतका लेट झाल्यावर तिचा नाद सोडून परत घरी जावं, तसंच माणसं त्याची वाट पाहत होती. तसं रोजच पाहत असतात. आता हुसेनला पाहिल्याबरोबर त्यांचे चेहरे तरतरीत झाले. त्यात दुधात साखर पडावी अशी गोष्ट झाली, म्हणजे माणक्या पण रानातून घरी येत होता.       हुसेन आणि माणिक समोरासमोर आल्याबरोबर हुसेनने उत्साहाने माणिकला हात जोडून ‘‘राम-राम माणिकराव पाटील, जयहिंद, नमस्ते, सलाम आलेखुम माणिकराव पाटील.’’ असं म्हटलं.      ‘‘अरे, बस बस, इतके राम-राम नको, तुला भी राम-राम, जयहिंद, नमस्ते, सलाम आलेखुम हुसेनभाई जमादार!’’       ‘‘ओ पाटील – जमादार, त्या भगत्याचा काटा काढल्यामुळं तुमची लईच शान वाढली. अन् लईच कोंबड्यावनी तुरा काढून तुमी फिरायला लागलं राव गावात.’’ एकजण म्हणाला.         तेवढ्यात माणिक हुसेनला मागे ढकलत म्हणाला, ‘‘ए हुसेन, जा जरा मागं, खेळू हुतूतू.’’         ‘‘आरं पण दोघंच?’’ ...

माणक्या-हुस्न्या जिंदाबाद !

    शेवटी एक दिवस भर दुपारी धाडस करून हुसेनभाई भगताच्या घरी गेला. हुसेनला पाहताच भगत खूश झाला. म्हणाला, ‘‘बरं वाटतंय ना आता हुसेनचाचा?’’    ‘‘बरं, म्हंजी पार पहिल्यावाणी दुरुस्त झालो.’’ भगत खुलला, म्हणाला, ‘‘वो हरामखोरने तुझे पकडा था ना, उसे ऐसा पिटाया, साला भाग गया.’’ अन् भगत खांदे उडवत हसत होता.     ‘‘अब क्यूँ आया बोल?’’ भगतनं विचारलं,      ‘‘कुछ नही. आपलं दर्सान घ्यावं, पाया पडून आभार मानावं म्हणून आलो होतो.’’ हुसेननं भगताचे पाय धरले. भगत त्याच्या पाठीवर हात मारत उठवत म्हणाला, ‘‘हुसेन, घाबरू नको. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागणार नाही. काही शंका आली की कधीही ये, सांग, मोकळेपणानं सांग.’’     मग हळूच हुसेनभाई म्हणाला, ‘‘तेच सांगायला आलो होतो.’’     ‘‘अरे, उसमें क्या, बतावो, काय सांगायचं ते सगळं सांग.’’      हुसेन मांडी घालून बसला. डोळे मिटले. बराच वेळ तो काहीच बोलला नाही. नुसतीच शांतता, मग डोळे उघडत तो म्हणाला- ‘‘भगत महाराज, त्या दिवसी तो लाग्या तुमच्या भीतीनं पळ...

हुसेनला आवाहन

         मुलांनी हुसेनभाईला जो नाग भेटला, त्यातून साधू निघाला, वगैरे वगैरे गोष्ट आपल्या-आपल्या घरी, आपसांत सगळ्या मित्रांना –- जे त्या दिवशी हुसेनभाईंचीही गोष्ट ऐकायला नव्हते -– त्या सगळ्या मित्रांना सांगितली. हुसेनभाईंच्या बाता अशा रंजक असतात आणि बऱ्याच वेळा सत्य तर बर्‍याच वेळा कल्पितही असतात, हे गावातल्या मंडळींना माहीत होते. लोकांनी एवढाच अर्थ काढला की हुसेनभाईला त्या दिवशी फार वेगळे काही झाले नव्हते. आपण गांजासारखी काहीतरी भयानक गोष्ट ओढल्यामुळे त्याच्या मनात पाप भावना तयार झाली. अपराधभावनेतून तो असा वागला. भल्या माणसाचे, भिडस्त माणसाचे असेच होत असते आणि लाग्या वगैरे तर काहीच नव्हते.           हुसेनच्या बुढ्ढीच्याही हे लक्षात आले. एके संध्याकाळी हुसेनचे तीनही भाऊ, सूना, नातवंडे जेवण करून पडवीत बसले होते, तेव्हा बुढ्ढीने हुसेनला जवळ बोलावले आणि सांगितले, हुसेन जो हुआ वा भूल जा. तिने कुराणातील वचन सांगितले, सत्यप्रिय गोष्ट अल्लाला प्यार्‍या असतात. अल्ला तुझ्याच काय पण सर्वांच्याच पापाची नोंद घेऊन आहे आणि म्हणूनच तो सर्वांच्या पा...

हुसेनभाई आणि नाग

    असेच चार-पाच दिवस गेले. हुसेनला आता बरं वाटू लागलं होतं. घरात त्याला करमेनासं झालं. त्यानं विचार केला- आता बाहेर तर पडावंच लागेल , थोडी कंबर बांधलीच पाहिजेच. त्यानं ठरवलं , आज संध्याकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे गावात चक्कर मारू आणि पारावर बसायला जाऊ. माणसं भेटतील , मुलं भेटतील , त्या दिवशी  आपल्याला नेमकं काय झालं होतं , हे तर ते विचारतीलच , ह्या कल्पनेनं तो थोडा अस्वस्थ झाला , पण कधीतरी ह्या प्रश्‍नाला सामोरं जावं लागणारंच आहे. दुपारी पाचच्या दरम्यान गावात एक फेरी मारून तो पारावर येऊन बसला. जिकडं-तिकडं सामसूम होती. त्याला रस्त्यात कोणी भेटलं नाही. पारावरही कोणी नव्हतं. त्यानं विचार केला , इथंच बसून राहू. थोड्या वेळात शाळा सुटेल. मुलांचा गलबला सुरू होईल. रानातनं माणसं येतील. तो अजूनही ताणातच होता अन् चेहरा अपराध भावाने निस्तेज झालेला. हताश मनानं त्यानं समोर पाहिलं , मारुतीचं देऊळ , शाळा , सगळं जिथल्या तिथं शांत आहे. त्या शांततेने त्याला आणखी उदास वाटू लागतं.     इकडे वर्गात बसलेल्या कुणीतरी मुलांनी खिडकीतून पाहिलं , समोर पारावर हुसेनचाचा...