Skip to main content

बाता मारण्यापूर्वी

मंडळी,
बाता मारायला मला आवडतात. माणसं जमली की गप्पाचा फड रंगवणं मला जमतं, आवडतं. बाता मारणारी माणसं मला सतत भेटत गेली. काही सांगत गेली, काही माझं ऐकत गेली.
आडबाजूला असलेलं खेडं, जिथं दिवसातून एखादी एस.टी. येत असे तेवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क. एरव्ही एक सवतं व स्पेशल बेट असल्यासारखं. अशा गावातच माझा आयुष्यातील बहुतांश काळ गेला. आजही जात आहे.
गाव म्हणलं की कामसू, रिकामटेकडी, प्रेम करणारी, भांडणारी, काही उपद्रवी काही सोशल. अशी बरीच माणसं एकमेकाला धरून राहतात. यातल्या रिकामटेकड्यांना रिकामी माणसं कसं म्हणावं. त्यांना बोलायला वेळ असतो. त्यांचा टाईमपास त्यातच होतो. कधी कधी मलाही हुक्की येते त्यांच्याबरोबर टाईमपास करण्याची. मग तीही बिझी होतात व मीही. हे रिकामटेकडेपण इतके पोकळ नसते की त्यात काहीच नाही. वाटतं की ही माणसं आपल्यातून वजा केली तर सगळी मज्जाच जाते. हा टाईमपास एन्जॉय करता येतो. कधी करमणूक तर कधी अंतर्मुखही करतो. कधी त्या अर्थहीन वाटतात, पण ह्यातच त्यांचं जीवन आहे. ते तरी दुसरं काय बोलणार. त्यांच्याजवळ राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, साहित्य संस्कृतीविषयी अफाट काय किंचितसुद्धा अभ्यास नाही. तरीही ते गप्पा मारतात, बोलतात. म्हणूनच काय बोलत असतील ही मंडळी.

आजपासून तो माझा टाईमपास आता तुमच्यासाठी - दर आठवड्याला - रविवारी.

Comments

Popular posts from this blog

हुसेनभाई बाताड्या

                                                 चार दिवस झाले. माणसं पाराकडं यायची. जरावेळ घुटमळायची. एकमेकांच्या पुडीतल्या तंबाखूचा बार भरायची अन् जायची. गप्पा रंगत नव्हत्या. कारण गेल्या चार दिवसांपासून हुसेनभाई बाताड्या कुठं फरार झाला हे कोणालाच कळेना. हुसेनभाई असल्याशिवाय पाराला शोभा नाही. हुसेनभाई मुलीकडं गेल्याची बातमी होती. पण गावातल्या माणसांनाच असं बुच्च बुच्च वाटत नव्हतं, तर सगळ्याच मुलांनाही. हुसेनभाईला प्रत्येक घरातलं मूल माहिती असायचं आणि प्रत्येकाची चेष्टा करणे, कधी बारीक खोडी करणे, कधी कौतुकाने खांद्यावर घेऊन जत्रेतला खेळ दाखविणे इथपासून कितीतरी... मुलांशी त्याची होणारी गट्टी पुढे ती मोठी झाल्यावर कशी विसरतील? त्यामुळंच लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही हुसेनभाईंचा राग कधी येत नव्हता. मुलांना शाबासकी देताना तो प्रत्येक वेळी जयघोष करायचा, अपने गॉंव के बच्चे सबसे भारी!  गावातली लहान-थोर मंडळी हुसेनभाईला त्याच्या मागे आणि काही तर त्याच्या ...

पारावरच्या बाता

ते   केवळ   वडाचं   झाड   नव्हतं .  आमच्या   गावातला   पुराणपुरुषच .  लांब   लांब   पसरलेल्या   फांद्या ,  त्यांच्या   पारंब्या ,  काही   लोंबकाळणाऱ्या   तर   काही   पुन्हा   जमिनीत सामील   झालेल्या .  गावात   जसं   कुणी   भिकार ,  भणंग ,  अंडेवाला ,  औषधवाल्या   वैदूपासून   कितीतरी   गावाबाहेरच्या   लोकांनी   गावात   यावं ,  कुणाच्या   घरासमोर    बसावं ,  कुठं अंग   लेटून   घ्यावं ,  कुणी   बोलावं ,  भांडावं ,  भोकणार् ‍ या   कुत्र्यांनाही   सतवावं ,  पण   ह्या   सगळ्यांना   गाव   सगळं   पोटात   घेतं ,  समजून   घेतं .  गावाचं   हे   पोक्तपण   मला आवडतं . वडाचंही   तसंच ,  घारी ,  गिधाडं ,  कावळे ,  चिमण्यांपासून   मुंग्यापर्यंत   अनेकांचं   ते ...

हुसेनभाईचा पतंग

         नाटकाचा खेळ सुरू झाला . मुलांनी केलेल्या कामाला हुसेनभाई उभा राहून प्रतिसाद देत होता . मधून - मधून ‘ शाबास रे गब्रु , शाबास रे बब्रु ’ असे ओरडून प्रोत्साहित करत होता .                गावातली मुलं आणि हुसेनभाई यांचं नातं फार   अतुट होतं . प्रत्येक मुलाशी बोलणार , चेष्टा मस्करी करणार , ह्यांमुळे हुसेनभाई दिसला की मुलंच त्याच्याकडे पाहून थांबायची .         परवाचीच गोष्ट . अनिल आपल्या आईबरोबर शेतात चालला होता , तर हुसेनभाईनं अनिलला विचारलं , ‘‘ काय बे , तुझा बा , दिसत नाही रे आजकाल ?’’                 ‘‘ गावाला गेलेत ,’’ अनिलनं सांगितलं . ‘‘ अरे , गावाला कुठलं , गेला तो तुला दुसरी आई आणायला ’’ अन् मोठ्यामोठ्याने हसू लागला . अनिलही लाजून हसला , तर त्याच्या आईला काय बोलावं हे कळंना . कधी एखादा मुलगा रस्त्यात भेटला , तर हुसेनभाई त्याला त्याच्या वडिलांच्या स्टाईलमध्ये ,...